For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एप्रिलमध्ये एसयुव्हीचा जलवा

06:15 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
एप्रिलमध्ये एसयुव्हीचा जलवा
Advertisement

19107 पंच कार्सची विक्री : फ्राँक्स दुसऱ्या स्थानी

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये  कार विक्री समाधानकारक राहिली होती. यात एसयुव्ही गटातील कार्सच्या विक्रीत दबदबा दिसून आला. कॉम्पॅक्ट वा मिड साइज सेगमेंट असो एसयुव्ही कार्सची लोकप्रियता दिवसेंदिवस ग्राहकांमध्ये वाढते आहे, हे यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे.

Advertisement

एप्रिलच्या महिन्यात पाहता एसयुव्ही गटात टाटा मोटर्सची ‘पंच’ ही कार विक्रीत आघाडीवर राहिली. टाटांच्या 19107 इतक्या पंच गाड्यांची विक्री सर्वाधिक एप्रिलमध्ये झाली. टाटांच्या पंचची किमत किफायतशीर असल्याने ग्राहकांची या कारला पसंती मिळते आहे. 5.64 लाख रुपये ही या कारची सुरुवातीची किंमत आहे. याच महिन्यात कार विक्रीत मारुतीची सुझुकी फ्राँक्स ही राहिली.  18829 फ्राँक्सची विक्री झालेली दिसून आली. या कारची सुरुवातीची किंमत 6.84 लाख रुपये इतकी आहे.

पॅसेंजर वाहन विक्री

याचदरम्यान एप्रिलमध्ये पॅसेंजर वाहनांची किरकोळ विक्री 4 लाख 7 हजार 355 इतकी रहिली होती. जी मागच्या वर्षी समान महिन्यात 3 लाख 63 हजार 38 इतकी होती. फाडाच्या माहितीनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या वाहन खरेदीत अधिक होती.

Advertisement
Tags :

.