For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोंढा रेल्वेस्थानकावरील कचरापेटीत संशयास्पद वस्तू

11:11 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोंढा रेल्वेस्थानकावरील कचरापेटीत संशयास्पद वस्तू
Advertisement

नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्याने खळबळ : धोकादायक नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा : रेल्वे पोलिसांची घटनास्थळी धाव

Advertisement

बेळगाव : रेल्वेस्थानकावरील कचऱ्याच्या पेटीत इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्याने एकच धावपळ उडाली. गुरुवारी सकाळी लोंढा रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली. बेळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची तपासणी केली. गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या पेटीत काही इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहिल्या. यामध्ये मदरबोर्ड, केबल, माऊस व इतर वस्तूंचा समावेश होता. संशय येऊन त्यांनी त्वरित पोलीस आऊटपोस्टमधील हवालदार शंकरानंद पुजेरी यांना माहिती दिली. काही वस्तू उघड्यावर टाकण्यात आल्या होत्या. तर काही वस्तू बॉक्समध्ये होत्या. या इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळजवळ नवीनच आहेत. घातपात घडविण्याचा हा कट असणार का? असा संशय बळावल्याने बेळगावहून श्वानपथक व स्फोटक तज्ञांना पाचारण करण्यात आले. रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक वेंकटेश व त्यांचे सहकारी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. स्फोटक तज्ञांनी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने कचरापेटीतील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तपासणी केली. यामध्ये स्फोटके नसल्याची खात्री पटताच ते बाहेर काढून पाहणी करण्यात आली. बहुतेक वस्तू नव्या आहेत.

पोलीस यंत्रणा सतर्क

Advertisement

कचरापेटीत या वस्तू कोणी टाकल्या? याची चौकशी करण्यात येत आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. कारण, कुठल्या तरी विद्याथ्यर्च्यां वस्तू चोरून त्या येथे टाकण्यात आल्या आहेत का? असा संशय बळावला आहे. बेंगळूर येथील रामेश्वरम कॅफेतील स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तपासणीअंती या केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे आढळून आल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

Advertisement
Tags :

.