सांबा येथे सीमेवर संशयास्पद ड्रोन
06:25 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
Advertisement
आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी एक संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन निदर्शनास आला. सदर ड्रोन काही मिनिटे चिल्यारी गावाजवळ भारतीय हद्दीवर घिरट्या घालत होता. हा ड्रोन जवळपास अर्ध्या तासानंतर पाकिस्तानच्या दिशेने परतल्याचे सांगण्यात आले. यासंबंधीची माहिती सुरक्षा दलांला मिळाल्यानंतर शस्त्रs किंवा अमली पदार्थ टाकले आहेत का हे शोधण्यासाठी सीमेवर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा शस्त्रे सुरक्षा दलाला सापडली नाहीत. यापूर्वी रामगड सेक्टरमधील रतनपूर गावात शुक्रवारी रात्री असाच एक संशयास्पद ड्रोन दिसला होता.
Advertisement
Advertisement