महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमृतसर विमानतळावर संशयास्पद ड्रोन

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/अमृतसर

Advertisement

अमृतसर येथील श्री गुऊ रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा ड्रोनची हालचाल दिसून आली. या घटनेमुळे विमानसेवेवर विपरित परिणाम झाला. ड्रोनची हालचाल पाहून विमानतळ प्राधिकरणासह सीआयएसएफ आणि पंजाब पोलिसांचे अधिकारी तत्काळ सतर्क झाले. तपास अधिकाऱ्यांनी ड्रोन कोठून आणि कोणी उडवले याचा शोध घेण्यास सुऊवात केली. तसेच ड्रोनची हालचाल थांबेपर्यंत विमानो•ाणेही थांबवण्यात आली. या प्रकारानंतर प्राथमिक तपासाअंती मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांनी अमृतसरहून पुणे, दिल्ली, मलेशिया इत्यादीसाठी जाणाऱ्या विमानांनी उ•ाण केले. या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. ड्रोन विमानाला धडकल्यास अपघात होण्याचा धोका असल्याने विमानतळाच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जात नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article