For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : निगवे खालसा येथे गाभण गायीचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ

01:32 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   निगवे खालसा येथे गाभण गायीचा संशयास्पद मृत्यू  गावात खळबळ
Advertisement

                                    निगवे खालसात गायीचा आकस्मिक मृत्यू

Advertisement

इस्पुर्ली : निगवे खालसा (ता. करवीर) येथील शेतकरी महादेव गोपाळा पाटील यांच्या गाभण गायीचा आकस्मिक मृत्यू झात्रा. मृतावस्थेत आढळून आलेल्या गायीच्या तोंडाजवळ भाकरीचा तुकडा अरोच बाजूलाच पञ्चावळीवर गुलाल लावलेला भात, पाच लिंबू त्या लिंबूंमध्ये खुपसलेल्या सुपा, बिया आढळून आला. हा करणी-भानामतीसारखा प्रकार असल्याच्या संशयाने गावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गायीचा मृत्यू झाल्याने महादेव पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.महादेव पाटील यांनी घरासमोरच गायीसाठी पत्र्याचे शेड उभारले आहे.बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तै गायीला वैरण पालण्यासाठी शेडचा दरवाजा उघडून आत गेले असता ही घटना उघडकीस आली,

Advertisement

त्याबर महादेव पाटील यानी शेजारी व अन्य ग्रामस्थांना चोलावून घेतले. काही वेळातच हे वृत गावात वाच्यासारखे पसरते घटनास्थळी ग्रामस्थाची मोठी गर्दी जमली. धक्कादायक बाब म्हणजे पाच शेतकन्यांची दोन महिन्यांपूर्वीही एक गाय याच पद्धतीने मरण पावती होती या प्रकाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला जात असून असा प्रकार करणान्यांवर तत्काळ कठोर कारवाई अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.