For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मसूद अझहरच्या भावाचा संशयास्पद मृत्यू

06:25 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मसूद अझहरच्या भावाचा संशयास्पद मृत्यू
Advertisement

जैशने गुपचूप केले दफन : हत्या झाल्याचा संशय

Advertisement

वृत्तसंस्था/ बहावलपूर

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वरचा मृत्यू झाला आहे. ताहिरवर बहावलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ताहिरचा मृत्यू कशामुळे झाला हे जैशकडून सांगण्यात आलेले नाही. ताहिर देखील जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता.

Advertisement

ताहिरच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही. त्याच्या मृत्यूचे कारण का लपविले जाते असा प्रश्न उपस्थित होतोय. पाकिस्तानात अलिकडच्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक दहशतवाद्यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. अशास्थितीत ताहिरच्या मृत्यूवरून अनेक दावे केले जात आहेत.

मसूदचा मोठा भाऊ होता ताहिर

ताहिर हा मसूद अझहरचा मोठा भाऊ होता. ताहिर हा मसूदच्या 5 भावांपैकी एक होता. ताहिर जैशच्या कारवायांमध्ये सक्रिय स्वरुपात सामील असायचा. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान बहावलपूरमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मसूदच्या परिवाराचे 10 सदस्य आणि काही सहकारी मारले गेले होते. मारले गेलेल्या लोकांमध्ये मसूदची बहिण, भाचा अन् परिवाराचे अन्य सदस्य सामील होते.

जैशच्या भारतविरोधी कारवाया

जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात राहिला आहे. 2001 मधील संसदेवरील हल्ला, 2008 चा मुंबई हल्ला, 2016 चा पठाणकोट हल्ला आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यात जैश सामील असल्याचा आरोप आहे. मसूद अझहर हा भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सामील आहे. मसूदला दीर्घकाळापासून जाहीरपणे पाहिले गेलेले नाही.

Advertisement
Tags :

.