महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मच्छे येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

06:17 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पतीसह सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मच्छे येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पतीसह सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपाताला नकार दिल्यामुळे ही घटना घडली आहे.

मंजुळा बोरेश ग•ाrहोळी (वय 22, रा. मच्छे) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. मंजुळा मूळची म्हैसूर तालुक्यातील मेटगहळ्ळीची. इन्स्टाग्रामवर ती रिल्स करीत होती. रिल्समुळे मच्छे येथील बोरेश ग•ाrहोळीबरोबर मंजुळाची मैत्री झाली. मेत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमापोटी मंजुळा म्हैसूरहून बेळगावला आली होती.

दीड वर्षापूर्वी मंजुळा व बोरेश यांचे लग्न झाले होते. सध्या मंजुळा गर्भवती होती. गर्भपातासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. पती, सासूसह सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यात येत होता. तिला व्यवस्थित जेवणही दिले जात नव्हते. गर्भपाताला तिने नकार दिल्यामुळे तिचा खून केल्याचा आरोप मंजुळाच्या आई हेमा यांनी केला आहे.

गुरुवार दि. 11 जुलै रोजी सायंकाळी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. म्हैसूर येथील कुटुंबीयांना यासंबंधीची माहिती देण्यात आली. शुक्रवारी कुटुंबीय बेळगावात दाखल झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मंजुळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मंजुळाची आई हेमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती बोरेश बाळप्पा ग•ाrहोळी, सासू कमलव्वा बाळप्पा ग•ाrहोळी, सासरे बाळप्पा निंगप्पा ग•ाrहोळी, दीर शिवानंद निंगप्पा ग•ाrहोळी, रेश्मा, आणखी एक महिला व एका अपंगावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्रामवरील रिल्समुळे जडले प्रेम

इन्स्टाग्रामवरील रिल्समुळे मंजुळा व बोरेश यांचे प्रेम जमले होते. बोरेशवरील प्रेमापोटी मंजुळा म्हैसूरहून बेळगावला आली होती. सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या जवळीकीचे प्रेमात रुपांतर झाले होते. पतीसमवेत मंजुळा एका शेडमध्ये राहात होती. सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article