ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकाचा संशयास्पद मृत्यू
07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मामेभावाची मुलगी ब्रिस्टी मुखर्जी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी बीरभूम जिल्ह्यातील कुसुम्बा गावातील घरात लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत हा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवत तपास सुरु केला आहे. 28 वर्षीय ब्रिस्टी यांनी मार्च 2023 मध्ये बोलपूर येथील एका उच्च प्राथमिक शाळेतील बिगर-शिक्षक कर्मचारी म्हणून मिळालेली नोकरी गमाविली होती. राज्यात सुमारे 26 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर बडतर्फ करण्यात आले होते.
Advertisement
Advertisement