कुटुंबाने मुलीच्या शेवटच्या फोन कॉलची आठवण सांगितली.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेने घटनेच्या काही तास आधी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेच्या आणखी एका वृत्तानुसार, मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिने मंगळवारी रात्री सुमारे १०:०५ वाजता तिच्या आईला फोन केला होता. तिच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, तिला भोपाळ सोडून नोएडाला परतायचे होते.
अचानक कॉल कट झाला अन्
संभाषण सुरू असताना तिचा नवरा खोलीत आल्यानंतर तिने अचानक कॉल कट केला,” असे भारतीय लष्करातील अधिकारी असलेल्या तिच्या भावाने सांगितल्याचे अहवालात म्हटले आहे.
"त्यानंतर आमच्या कुटुंबीयांकडून तिच्याशी, तिच्या पतीशी आणि तिच्या सासूशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही," असे त्यांनी पुढे सांगितले.
रात्री सुमारे १०:१५ वाजता, तिच्या सासूने घरच्यांकडून आलेल्या फोनला उत्तर दिले. तिच्या कुटुंबीयांनी तिला ताबडतोब तिची चौकशी करण्यास सांगितले, असे म्हटले जाते. सुमारे पाच मिनिटांनंतर, रात्री १०:२० वाजता, तिचा श्वास थांबला असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली, असे अहवालात पुढे म्हटले आहे