For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी सावकाराचा संशयास्पद मृत्यू

11:31 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासगी सावकाराचा संशयास्पद मृत्यू
Advertisement

संतोष पद्मण्णवरच्या मुलीने व्यक्त केला संशय : पोलीस तपास सुरू

Advertisement

बेळगाव : अंजनेयनगर येथील संतोष पद्मण्णवर (वय 46) या खासगी सावकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या मृत्यू प्रकरणाने एकच खळबळ माजली आहे. गेल्या बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी संतोष यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी त्यांच्यावर दफनविधीही केला आहे. संतोष यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली आहे.

संतोष यांच्या मुलीने फिर्याद दिल्यानंतर माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलीने आपल्या आईवरच संशय व्यक्त केला असून त्यामुळे सर्व शक्यता पडताळण्यात येत असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले. संतोष दुंडाप्पा पद्मण्णवर (वय 46) हे खासगी सावकारी करीत होते. त्यांना वाहनांचीही आवड होती. वेगवेगळ्या संघटनांच्या कामात ते सक्रिय असायचे. गेल्या बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे ते दगावले याचा उलगडा झाला नाही. संतोष यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच याप्रकरणी संशय बळावला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून शवचिकित्सा करावी लागणार असून यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

Advertisement

नेत्रदानाची इच्छा पूर्ण

संतोष पद्मण्णवर यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार खासगी इस्पितळात नेत्रदान करण्यात आले आहे. नेत्रदानाच्या प्रक्रियेनंतर अंत्यविधी उरकण्यात आला असून एकंदर प्रकरणाबद्दल संशय बळावल्याने त्यांच्या मुलीने फिर्याद दिली आहे.

Advertisement
Tags :

.