महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लखनौ विद्यापीठात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

06:42 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयए अधिकाऱ्याची कन्या : वसतिगृहाच्या खोलीत सापडला मृतदेह

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेशात लखनौमधील राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनिका रस्तोगी या 19 वषीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद स्थितीत विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला रुग्णालयात हलवले असता मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

अनिका ही एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून ती आयपीएस संतोष रस्तोगी यांची मुलगी आहे. तिचे वडील सध्या दिल्लीतील एनआयएमध्ये (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ‘आयजी’ म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री आपल्या खोलीत गेल्यापासून तिने दरवाजा न उघडल्यामुळे सकाळी तिच्या मैत्रिणींनी दरवाजा तोडला असता अनिका बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर अनिकाला तात्काळ ऊग्णालयात नेण्यात आले असता तपासणीअंती तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशियाना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवालातच अनिकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

संशयास्पद मृत्यूनंतर विद्यार्थी चिंतेत

या संशयास्पद मृत्यूमुळे विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचारी हादरले आहेत. अनिकाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. सद्यस्थितीत तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू केल्याचे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article