महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘आयसीसी’कडून श्रीलंकेवर निलंबनाची कारवाई

06:44 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

श्रीलंकेच्या क्रिकेट विश्वात आठवडाभर चाललेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मंडळात सरकारने केलेल्या हस्तक्षेपानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने पूर्ण सदस्य असलेल्या श्रीलंकेला निलंबित केले आहे. श्रीलंकेच्या संसदेने गुऊवारी देशाच्या क्रिकेट प्रशासकीय मंडळाला बरखास्त करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर केला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचा त्याला पाठिंबा लाभला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने श्रीलंका क्रिकेटचे ‘आयसीसी’ सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे, असे आयसीसीने यासंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

‘आयसीसी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. श्रीलंका क्रिकेटचा कारभार स्वायत्तपणे चालणे आणि श्रीलंकेतील क्रिकेटचे शासन, नियमन आणि प्रशासन यात कोणताही सरकारी हस्तक्षेप नसणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता एक सदस्य या नात्याने श्रीलंका क्रिकेटच्या बाबतीत गंभीर उल्लंघन घडलेले आहे. निलंबनाच्या अटींबाबत आयसीसी मंडळ योग्य वेळी निर्णय घेईल’, असे या निवेदनात म्हटले आहे.

श्रीलंकेच्या संसदेने संमत केलेला ठराव हा सरकारी हस्तक्षेप होता आणि तेच कारण ‘आयसीसी’ला श्रीलंकेचे सदस्यत्व निलंबित करण्यासाठी पुरेसे ठरले.  भारतात सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाची निराशाजनक कामगिरी राहिलेली असून त्यांना नऊ सामन्यांतून केवळ दोनच विजय मिळवता आले आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. या पार्श्वभूमीवर मुख्य विरोधी पक्षाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी ‘भ्रष्ट ‘एसएलसी’ (श्रीलंका क्रिकेट) व्यवस्थापन हटविण्याचा’ ठराव मांडला. त्याला सरकारचे वरिष्ठ मंत्री निमल सिरिपाला डी सिल्वा यांनी पाठिंबा दिला.

अपिल करण्याच्या न्यायालयाने मंगळवारी शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील एसएलसी व्यवस्थापनाची फेरस्थापना केल्यानंतर दोनच दिवसांनी संसदेने हा ठराव संमत केला. सोमवारी क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापन बरखास्त केले होते आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाची सात सदस्यीय अंतरिम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर न्यायालयाने मंडळाच्या व्यवस्थापनाची फेरस्थापना केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#NATIONAL#Sport
Next Article