For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई

06:41 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अलिकडेच अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या झालेल्या निवड चाचणी स्पर्धेवेळी उत्तेजक चाचणीसाठी मूत्रल नमुना देण्यास नकार दर्शविल्याने मल्ल बजरंग पुनियावर हंगामी स्वरुपी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाडाने हे प्रकरण अंधारात ठेवल्याने संतप्त झालेल्या भारतीय कुस्ती फेडरेशनने या संदर्भात जागतिक उत्तेजकविरोधी एजन्सीला (वाडा) लेखी कळविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. .

बजरंग पुनियावर नाडाकडून 23 एप्रिलपासून निलंबनाच्या कारवाईचा आदेश बजावण्यात आला आहे. या प्रकरणी बजरंग पुनियाकडून उत्तर पाठवण्यासाठी 7 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 10 मार्च रोजी सोनेपत येथे झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी स्पर्धेवेळी पुरूषांच्या राष्ट्रीय संघातील मल्लांकडून मूत्रल नमुन्या देण्याची सूचना करण्यात आली होती. पण बजरंगने मूत्रल चाचणी नमुना न देण्यास नकार दिला होता. या स्पर्धा चाचणीत बजरंग पुनियाला हार पत्करावी लागली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.