For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणे दरोड्यातील संशयितांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

05:37 PM Aug 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पुणे दरोड्यातील संशयितांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान , गोविंद दिनवाणी - वय २२ वर्षे ,राजस्थान , राजुराम बिष्णोई वय - २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत या संशयित आरोपींनी पोलिसांना चेक पोस्टवर गुंगारा देत चकवा देण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु , पोलिसांनी शिताफीने त्यांना अखेर जेरबंद केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.