For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओवळीये खून प्रकरणातील संशयितांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

05:46 PM Apr 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओवळीये खून प्रकरणातील संशयितांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून 71 वर्षीय सौ.सरस्वती धोंडी सावंत या वृद्ध महिलेच्या डोक्यावर मानेवर व पाठीवर कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले त्याच गावातील व वाडीतील संशयित विजय कृष्णा सावंत व रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्रांना न्यायालयाने पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना रविवारी घडली होती. या घटनेबाबत मृत सरस्वती सावंत हिचा मुलगा एकनाथ सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ खून प्रकरणी दोघाही संशयताना अटक केली होती. तसेच पोलिसांनी तपास करीत या गुन्ह्यात संशयितानी वापरलेला कोयता जप्त केला होता. अटक करून या दोघांना सावंतवाडी न्यायालयाने पाच दिवसाची म्हणजे ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत आज शनिवार 4 एप्रिल रोजी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फेही न्यायालयात युक्तिवाद झाला. तर संशयित आरोपींतर्फे ऍड परिमल नाईक व ऍड सुशील राजगे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून दोन्ही संशयितांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.