For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली आग दुर्घटनेतील संशयितांना कोठडी

06:38 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली आग दुर्घटनेतील संशयितांना कोठडी
Advertisement

बाल संगोपन केंद्राच्या मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील विवेक विहार भागातील एका बेबी केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला.  या प्रकरणातील आरोपी ऊग्णालय मालक डॉ. नवीन खिची आणि डॉ. आकाश यांना तीन दिवसांची (30 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

दिल्ली पोलिसांनी बाल ऊग्णालयाचे मालक नवीन खिची यांच्याविऊद्ध आयपीसी कलम 336 (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्मयात आणणे), 304ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 34 (गुन्हेगारी क्रियाकलाप) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. घटनेनंतर नवीन खिची हा फरार झाला होता. त्याला रविवारी अटक करण्यात आली.

ऊग्णालयाची नोंदणी मार्च 2024 मध्ये संपली आहे. ऊग्णालयाच्या मालकाचे पश्चिम पुरी येथेही ऊग्णालय आहे. आकस्मिक तपासणीत त्या हॉस्पिटलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे दिल्लीतील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले.

Advertisement
Tags :

.