गांजा बाळगल्याप्रकरणी अटकेतील संशयितांना सशर्त जामीन
संशयितांतर्फे ॲड. स्वरुप पई, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. पार्श्वनाथ गरगटे यांनी पाहिले काम
मालवण । प्रतिनिधी
वराड-कुसरवे येथे अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी अटक संशयीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. पार्श्वनाथ गरगटे यांनी काम पाहिले.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी दि. ३१ जुलै 2025 रोजी वराड-कुसरवे येथे केलेल्या कारवाईत 262 ग्रॅम गांजासहीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली या संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चारही संशयितांना मालवण पोलीसांनी अटक केली. संशयितांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या. त्याप्रमाणे प्राथमिक तपासकाम करून पोलिसांनी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता मालवण पोलिसानी सर्व संशयितांची 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली. संशयितांतर्फे केलेल्या युक्तीवादानुसार मालवण पोलिसांनी रिकव्हरी पूर्ण झाली असल्याने व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याचूया कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून संशयीताना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर संशयीतातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आले. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.