For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या संशयित चोरट्याला चोप

07:59 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या संशयित चोरट्याला चोप
Advertisement

गणपत गल्ली येथील घटना : संशयित पोलिसांच्या ताब्यात   

Advertisement

 त. भा.  प्रतिनिधी

बेळगाव : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयित तरुणाने दागिने घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला जमावाने पकडून चांगलाच चोप दिला. मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान गणपत गल्लीत एका सराफी दुकानात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सदर माहिती समजताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान एक तरुण गणपत गल्लीतील सराफी दुकानात आला. त्याने सोन्याचे टॉप दाखविण्याची मागणी केली. त्यावेळी दुकानचालकाने सोन्याचा दर सांगितला. आपल्याकडे पैस आहेत. तुम्ही टॉप दाखवा अशी मागणी त्याने केली. सदर तरुण कन्नड भाषेत संवाद साधत होता. त्याच्या एक हातात पिशवीही होती. गिऱ्हाईकाने टॉप दाखविण्याची मागणी केल्याने दोन टॉप वजनकाट्यावर ठेवले. दुकानदाराची नजर चुकवून त्यातील एक टॉप त्याने उचलला आणि पत्नीला बोलावून आणतो असे म्हणत दुकानातून बाहेर पडला. वजन काट्यावरील दागिन्यांचे वजन कमी दिसून येताच दुकानदाराने चोर चोर अशी आरडाओरडा केली. तितक्यात त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यावेळी त्याच्याकडे 4 ग्रॅमचा टॉप असल्याचे दिसून आले. गणपत गल्लीत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारीवर्गात खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे.

Advertisement
Tags :

.