For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलेवर अत्याचार करून पलायन केलेल्या संशयितास सावंतवाडीत अटक

04:40 PM Jan 31, 2026 IST | अनुजा कुडतरकर
महिलेवर अत्याचार करून पलायन केलेल्या संशयितास सावंतवाडीत अटक
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

वसई विरार येथे एका महिलेवर अत्याचार करून सावंतवाडीत वास्तव्यास आलेल्या एका संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (51 ) रा. नालासोपारा , मुंबई असे त्याचे नाव आहे. वसई विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा तुळीज परिसरातील एका महिलेवर अत्याचार करून तो सावंतवाडी शहरात पळून आलेला होता. नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक उपनिरीक्षक निलेश परब व हवालदार मनोज राऊत यांनी शोध घेऊन त्यास नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.