महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेंगळूर स्फोटप्रकरणी बळ्ळारीतून संशयिताला अटक

12:43 PM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्य आरोपीला पलायन करण्यास मदत केल्याचा संशय : बेंगळूरमधील अज्ञातस्थळी एनआयएकडून चौकशी सुरू

Advertisement

बेंगळूर : बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या घटनेचा तपास करणाऱ्या एनआयएने बुधवारी बळ्ळारीत एका संशयिताला अटक केली आहे. शब्बीर असे त्याचे नाव आहे. पॅफेतील स्फोटात त्याचा निकटचा संबंध असल्याचे तपासातून आढळून आल्यामुळे एनआयएला पुढील तपास जलदगतीने करण्यास मदत होणार आहे. शब्बीर हा बळ्ळारी जिल्ह्यातील तोरणगल येथील नामवंत कंपनीत कामाला आहे. तो बळ्ळारीच्या बसस्थानक परिसरात वास्तव्यास आहे. बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांपूर्वी एका संशयित आरोपीला अटक करून चौकशी करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवारी पहाटे 4 वाजता एनआयएच्या पथकाने बळ्ळारी नव्या बसस्थानकाजवळील घरातून शब्बीरला अटक केली. शब्बीरने रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडविलेल्या आरोपीला फोन केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. 1 मार्च रोजी बॉम्बस्फोट घडविणाऱ्याने बेंगळूरमधून तुमकूरला, नंतर तेथून बळ्ळारीपर्यंत बसप्रवास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. यावेळी शब्बीरने स्फोट घडविणाऱ्या संशयित दहशतवाद्याला हैदराबादला पलायन करण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संशयित दहशतवाद्याने हैदराबादमध्ये आसरा घेतल्याचा संशय आहे. शब्बीरने प्रमुख आरोपीला फोन केल्याचे समजताच त्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक करून बेंगळूरमध्ये अज्ञातस्थळी चौकशी सुरू केली आहे. मूळच्या बळ्ळारी येथील मीनाज उर्फ सुलेमान या संशयित दहशतवाद्याच्या टोळीने बेंगळूरमधील कॅफेत स्फोट घडविल्याचा दाट संशय एनआयएच्या पथकाला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#nianews#rameshwaramcafeblast#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article