बहिणीवरच 5 वर्षे लैंगिक अत्याचार,संशयितालाअटक
केपे : अल्पवयीन असलेल्या एका आपल्या बहिणीवरच लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन केपे पोलिसांनी केपे परिसरातील 26 वर्षीय युवकाला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या संशयित आरोपी युवकाला 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने याप्रकरणी सविस्तर माहिती दिली. आपल्या अल्पवयीन बहिणीवर हा संशयित आरोपी गेल्या 5 वर्षापासून हे अत्याचार करीत होता. लैंगिक अत्याचाराची ही घटना 2020 ते 8 ऑगस्ट 2025 पर्यंत घडत होती असे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलेले आहे.
या घटनेची वाच्च्यता केल्यास नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर घालून बदनाम करण्याची धमकी आरोपीने दिली होती अशीही माहिती पालिसांनी दिली. इतकेच नव्हे तर संशयित आरोपी तिला लाकडी दंडुक्याने मारहाणही करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी केपे पोलिसांनी या संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 376, 506 (2) तसेच भारतीय न्याय संहितेच्या 64, 118 आणि 351 (3) कलमाखाली गुन्हा नोंद केल्यानंतर या संशयित आरोपीला अटक केली.