महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जामिनानंतर फरार असलेल्या संशयिताला धाडले कारागृहात

11:40 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमलीपदार्थ विक्रीप्रकरणी कारवाई

Advertisement

बेळगाव : अमलीपदार्थांच्या विक्री प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळविल्यानंतर तब्बल दोन वर्षे फरारी झालेल्या एका तरुणाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली. नईम अब्बास खोजा (वय 29) मूळचा राहणार टिपू सुलताननगर, गोकाक, सध्या रा. आसदखान सोसायटी असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, बी. के. मिटगार, एन. एम. देसाई, बी. एम. नरगुंद, खादर खानमन्नावर, गोविंद पुजारी, एन. डी. बिरगोंड आदींनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी एपीएमसी पोलिसांनी अमलीपदार्थांच्या विक्रीप्रकरणी नईमला अटक केली होती. त्याच्यावर कलम 20(बी)(2), बी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा न्यायालयीन तारखेला हजर झाला नव्हता. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. शनिवारी एपीएमसी पोलिसांनी नईमला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article