पुण्यातील सुश्रुत पुरस्कार डॉ. वीरधवल पाटील यांना जाहीर
प्रोक्टॉलॉजीतील योगदानाबद्दल सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. वीरधवल शामराव पाटील यांना पुण्यातील मंगल मेडिकल आणि रिसर्च फौंडेशनचा सुश्रुत पुरस्कार जाहीर झाला आहे. आयुर्वेदात एमएस केलेल्या डॉ. पाटील यांच्या प्रोक्टॉलॉजीतील योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. फौंडेशनचे अध्यक्ष कुणाल कामथे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. 27 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण कोंढवा बीके येथे होणार आहे. या सोहळ्यात पुण्यातील आयुषचे निवृत्त सहाय्यक संचालक डॉ. वेंकट धर्माधिकारी, डॉ. रविशंकर पेरवजे यांना जीवनगौरव, हिंगोलीचे डॉ. गजानन धाडवे, नागपूरच्या प्रोफेसर डॉ. शीतल असुटकर यांना सुश्रुतरत्न तर दिल्लीच्या प्रीती छाब्रा आणि पुण्याचे डॉ. प्रशांत दौंडकर यांना आयुर्वेद आयकॉन पुरस्काराने आणि प्रोक्टॉलॉजीतील योगदानाबद्दल कोल्हापूरच्या डॉ. वीरधवल पाटील आणि गदग येथील डॉ. एम. डी. समुद्री यांना गौरविण्यात येणार आहे. डॉ. वीरधवल पाटील यांनी मुळव्याध, भंगदरच्या हजारो रूग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष (कै.) शामराव उर्फ एस. बी. पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.