For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेतोरे गावचे प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक हे 'वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारा'ने सन्मानित

वेतोरे गावचे प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक हे  वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारा ने सन्मानित
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर) : वेतोरे-वरचीवाडी चे पोलीस पाटील तथा प्रगतशील शेतकरी सुशांत मोठन नाईक यांना कोकण विभागातून आंबा, काजू व भाजीपाला उत्पादक व विक्री शेतकरी म्हणून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा 'वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार' महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते यवतमाळ-पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, सुधाकर नाईक प्रेक्षागृहात प दान करण्यात आला.
कै. वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतीदिन सोहळ्याचे औचित्य साधून मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी यवतमाळ-पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा 'वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार' बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, सुधाकर नाईक प्रेक्षागृहात प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पर्यटन, उच्च शिक्षण, उद्योग, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री शरद गडाख, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद चे कार्याध्यक्ष धनंजय सोनी व संस्थेचे संचालक, यवतमाळ जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.