महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टी-20 ची धुरा सूर्यकुमार यादवकडे, वनडेची कॅप्टनसी रोहितकडेच

06:10 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर : विराट, केएल राहुलही परतला : श्रेयस अय्यरलाही स्थान : बुमराहला विश्रांती

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सुर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असेल. विशेष म्हणजे, वनडे आणि टी-20 संघाचे उपकर्णधार शुभमन गिलकडे असणार आहे. तसेच विराट कोहलीही दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात परतला आहे तर आगामी काळातील व्यस्त पाहता जसप्रीत बुमराहला मात्र विश्रांती देण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि टी-20 मालिका होणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी गुरुवारी भारताचा वनडे व टी-20 संघ जाहीर करण्यात आला. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. हार्दिक पंड्या हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात होते. पण ही चर्चा सुरु असताना सूर्यकुमार यादवचे नाव आले. यामुळे हार्दिक आणि सूर्या यांच्यापैकी भारताचा टी-20 कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. ही उत्सुकता आता संपलेली आहे. टी-20 संघाच्या कर्णधारपदी आता सूर्यकुमार यादवची वर्णी लागलेली असून हार्दिक पंड्याचा पत्ता कट झाला आहे.

मुख्य प्रशिक्षक गंभीर यांचा पहिलाच दौरा

गौतम गंभीर दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला होता. भारतीय प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच नियुक्ती असेल. 42 वर्षीय गंभीरने ‘द वॉल‘ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडची जागा घेतली आहे. दरम्यान, निवड समितीच्या बैठकीत गंभीरने श्रीलंका दौऱ्यावरील वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना खेळण्याची विनंती केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फार कमी वनडे सामने येत असल्याने गंभीरने ही विनंती केली होती. दरम्यान, रोहित व विराट लंका दौऱ्यात वनडे मालिकेत खेळणार आहेत. बुमराहला मात्र विश्रांती देण्यात आली आहे.

शुभमन गिलला लॉटरी

वनडे टीमसाठी उपकर्णधार कोण असणार अशी चर्चा जोर धरत होती. यावेळी वनडे टीमच्या उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या वनडेमधून हार्दिक पंड्याने यापूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे उपकर्णधार कोण होणार हा प्रश्न सर्वांसमोर होता. टी-20 फॉरमॅटमध्येही शुभमन गिलच्याच खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ 

भारताचा टी-20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकु सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article