For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सूर्यकुमारला तंदुरूस्तीसाठी आणखी कालावधीची गरज

06:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सूर्यकुमारला तंदुरूस्तीसाठी आणखी कालावधीची गरज

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारतीय संघातील आक्रमक फलंदाज तसेच टी-20 प्रकारातील टॉप सिडेड सूर्यकुमार यादवला आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी काही कालावधीची गरज असल्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रवक्त्याने सांगितले. सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला आणखी काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल. सूर्यकुमारच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या या दुखापतीवर वैद्यकीय इलाज केले जात असून या दुखापतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन संघातील आक्रमक फलंदाज आहे. सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरु झाली असून सूर्यकुमारला या स्पर्धेतील आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. टी-20 प्रकारामध्ये 33 वर्षीय सूर्यकुमार यादवची तुलना दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स बरोबर केली जाते. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 60 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना 4 शतकांसह 2141 धावा जमविल्या आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर येत्या सोमवारी मुंबईत होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.