कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

10 दिवस टूथपेस्ट खाऊन राहिला जिवंत

06:13 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिमाच्छादित पर्वतांदरम्यान चुकला होता वाट

Advertisement

एक व्यक्ती 10 दिवसांपर्यंत हिमाच्छादित पर्वतांदरम्यान भटकत राहिला. यादरम्यान तो केवळ टूथपेस्ट खाऊन जिवंत राहिला आहे. हा चकित करणारा प्रसंग चीनमध्ये घडला आहे.  येथे उत्तर-पश्चिम चीनच्या हिमाच्छादित पर्वतीय भागांमध्ये 10 दिवसांपर्यंत अडकून राहिल्यावर एका 18 वर्षीय युवकाला यशस्वीपणे वाचविण्यात आले आहे. या 10 दिवसांच्या कालावधीदरम्यान भोजनाच्या कमतरतेला तोंड द्यावे लागल्यावर त्याने सुन लियांग नदीचे पाणी, वितळलेला बर्फ आणि टूथपेस्ट खाऊन जिवंत राहण्यास यश मिळविले.

Advertisement

प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश

सन नावाच्या या व्यक्तीने 8 फेब्रुवारी रोजी स्वत:चा पायी प्रवासाची सुरुवात केली आणि क्विनलिंग येथे पोहोचला. हे शांक्सी प्रांतातील एका प्रमुख पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग सुमारे 2500 मीटरच्या सरासरी उंचीवर आहे. येथे त्याने धोकादायक आणि प्रतिबंधित ताओ-लाइनवर चालण्यास सुरुवात केली. मागील 20 वर्षांमध्ये या धोकादायक मार्गावर 50 हून अधिक प्रवासी बेपत्ता झाले आहेत किंवा स्वत:चा जीव गमावून बसले आहेत.

परिवारासोबतचा संपर्क तुटला

दोन दिवसांनीच सनचा स्वत:च्या परिवारासोबतचा संपर्क तुटला, कारण त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बॅटरी डिस्चार्ज झाली. जंगलात अडकलेला सन एका नाल्याच्या काठावरून चालत होता आणि अनेकदा तो खाली कोसळला. यामुळे त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. जोरदार वाऱ्यांपासून वाचण्यासाठी त्याने मोठ्या खडकामागे आश्रय घेतला आणि भूसा तसेच पानांचा वापर करत एक अस्थायी बेड तयार केला, 17 फेब्रुवारी रोजी बचावपथकाने त्याला शोधून काढले. एक स्थानिक शोध अन् बचाव पथक त्याच्या परिवाराच्या विनंतीवर पर्वतांवर पोहोचले होते. सनने आग पेटविली असल्याने पथकाला धूर दिसून आला, मग सनचा ठावठिकाणा कळल्याने त्याला वाचविण्यास यश आले.

अनेकांनी गमाविला आहे जीव

170 किलोमीटर लांब एओ-ताई लाइनवर सन चालत होता, हा मार्ग एओ पर्वत आणि ताइबाई पर्वताला जोडतो. हा स्वत:च्या अत्यंत अनपेक्षित हवामानामुळे चीनच्या पाच सर्वात अवघड पायी मार्गांपैकी एक मानला जातो. मागील दोन दशकांमध्ये या धोकादायक मार्गावर 50 हून अधिक वाटसरू बेपत्ता झाले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे.

2018 पासून प्रतिबंधित

2018 साली स्थानिक अधिकाऱ्यांनी या क्षेत्रात प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. तसेच याचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद केली होती. तरीही काही साहसी लोक तेथे पायी प्रवास करत अतसतात. सन हा या धोकादायक क्षेत्रात हरवून गेल्यावर वाचविण्यात आलेला पहिलाच इसम आहे. सनने मागील एक वर्षात तीन प्रसिद्ध हिमाच्छादित पर्वत सर केले होते. एओ-ताई मार्गावरील बंदीविषयी मला माहित नव्हते. तेथे हायकिंग करण्याची प्रेरणा केवळ आव्हानाचा सामना करण्यासाठी होती असे सनने सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article