For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगन्नाथ मंदिर रत्नभांडारात दुसऱ्यांदा सर्वेक्षण सुरू

06:29 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगन्नाथ मंदिर रत्नभांडारात दुसऱ्यांदा सर्वेक्षण सुरू
Advertisement

वृत्तसंस्था/ पुरी

Advertisement

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने शनिवारी दुपारी पुरीतील जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारमध्ये पुन्हा सर्वेक्षण सुरू केले. हे सर्वेक्षण तीन दिवस चालणार आहे. सर्वेक्षण होतानाच्या कालावधीत भाविकांना दुपारी 1 ते सायंकाळी 6 या वेळेत दर्शन घेण्यास मनाई असेल. येथे 18 सप्टेंबर रोजी पहिले सर्वेक्षण करण्यात आले. ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा खजिना 14 जुलै रोजी उघडण्यात आला. येथे सापडलेल्या मौल्यवान वस्तूंची डिजिटल यादी केली जात आहे. या नोंदींमध्ये त्यांचे वजन आणि निर्मितीसंबंधीचा तपशील नमूद करण्यात येणार आहे.

येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना शेवटचा अधिकृतपणे 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये उघडण्यात आला होता. त्यानंतर यंदा प्रथमच मंदिराच्या भांडारातील वस्तूंची मोजदाद करण्यात आली. तिजोरी उघडण्यापूर्वी प्रशासनाने सहा जड लाकडी पेट्या मागवण्यात आल्या होत्या. एक पेटी उचलायला आठ ते दहा जण लागले होते.

Advertisement

भगवान जगन्नाथाचे मौल्यवान दागिने रत्न भांडारात

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रत्न भांडारमध्ये तीन खोल्या आहेत. 25 बाय 40 चौरस फूट आतील चेंबरमध्ये 50 किलो 600 ग्रॅम सोने आणि 134 किलो 50 ग्रॅम चांदी आहे. हे दागिने कधीही वापरले गेले नाहीत. बाहेरील चेंबरमध्ये 95 किलो 320 ग्रॅम सोने आणि 19 किलो 480 ग्रॅम चांदी आहे. हे सणासुदीला काढले जातात. तर चालू चेंबरमध्ये 3 किलो 480 ग्रॅम सोने आणि 30 किलो 350 ग्रॅम चांदी आहे. हे दागिने व रत्न दैनंदिन विधींसाठी वापरले जातात.

11 सदस्यीय समिती

ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंदा पाधी, एएसआय अधीक्षक डी. बी. गडनायक, पुरीच्या राजा गजपती महाराजाचे प्रतिनिधी यांच्यासह एकूण 11 जणांचा मोजदाद समितीमध्ये समावेश आहे. पर्यवेक्षी पॅनेलमधील दोन सदस्य आणि सेवक समाजातील चार जणांनाही समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.

Advertisement
Tags :

.