कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ले व शिरोडा बस स्थानकांचे सर्वेक्षण

05:28 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत सर्वेक्षण

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत चार सदस्यीय सर्वेक्षण समिती मार्फत वेंगुर्ले बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. बस स्थानकात असणाऱ्या सेवा, सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहाणी करण्यात आली. यावेळी रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिक्षक शंकर यादव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेश्वर जाधव, सर्वेक्षण समिती पत्रकार सदस्य अमित भरत सातोस्कर, प्रवासी मित्र राधाकृष्ण वेतुरकर या चार सदस्यीय समिती मार्फत बसस्थानक इमारत व परिसराची पाहाणी सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, सहायक वाहतूक निरीक्षक श्री. सासोलकर, शिरोडा बस स्थानक वाहतूक नियंत्रक लालसिंग पवार आदी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार सन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियान स्पर्धात्मक स्वरुपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानाचा कृती कालावधी 23 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 असा आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा 6 प्रादेशिक स्तरावर व एकत्रित अंतिम स्पर्धा राज्यपातळीवर आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # vengurla # shiroda# bus stand #
Next Article