For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण

02:50 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण
Advertisement

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत चार सदस्यीय सर्वेक्षण समिती मार्फत मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. बस स्थानकात असणाऱ्या सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहाणी करण्यात आली.यावेळी रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिक्षक शंकर यादव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेश्वर जाधव, सर्वेक्षण समिती पत्रकार सदस्य अमित खोत, प्रवासी मित्र अनंत सामंत या चार सदस्यीय समिती मार्फत बसस्थानक इमारत व परिसराची पाहाणी सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स.वा. नि. सतीश वाळके, विनोद शंकरदास, वरिष्ठ लिपिक दिलीप हिंदळेकर आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियान स्पर्धात्मक स्वरुपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानाचा कृती कालावधी २३ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ असा आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा ६ प्रादेशिक स्तरावर व एकत्रित अंतिम स्पर्धा राज्यपातळीवर आयोजीत करण्यात आली आहे.

Advertisement

प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 10 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), द्वितीय 5 लाख, तृतीय 2 लाख 50 हजार. ब वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 5 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), 2 लाख 50 हजार, 1 लाख 50 हजार. क वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 1 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), 50 हजार, 25 हजार अशी पारितोषिक आहेत. राज्य स्तरावर विजेत्या बसस्थानकांना अ वर्ग प्रथम क्रमांक 1 कोटी (चषक प्रशस्तीपत्र), ब वर्ग प्रथम क्रमांक 50 लाख (चषक व प्रशस्तीपत्र), क वर्ग बस स्थानक प्रथम क्रमांक 25 लाख (चषक व प्रशस्तीपत्र) अशी पारितोषिक आहेत.

फोटो : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत चार सदस्यीय सर्वेक्षण समिती मार्फत मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

Advertisement
Tags :

.