कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्व्हे पूर्ण : नुकसानभरपाईची प्रतीक्षा

12:48 PM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृषी, बागायत पीकहानी अहवाल पाठविला सरकारकडे : जिल्ह्यात 75 हजार 831.22 हेक्टरमध्ये नुकसान 

Advertisement

बेळगाव : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने महापुराला तोंड द्यावे लागले. परिणामी पाणी शेतजमिनीत आल्याने मोठ्या प्रमाणात पिके वाया गेली. यामुळे कृषी खात्याकडून पीकहानी सर्व्हेचे काम हाती घेऊन विविध पिकांच्या नुकसानीची माहिती संग्रहित केली असून, सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात  एकूण 75 हजार 831.22 हेक्टरमधील विविध पिकांची हानी झाली आहे. यामध्ये कृषी 57 हजार 831.22 तर 18 हजार हेक्टर बागायत पिकांची हानी झाली आहे. याचा अहवाल सरकारकडे पाठविला आहे. मे अखेर व जून महिन्यात मान्सून पावसाने जोर धरल्याने सर्वत्र अतिवृष्टी  सदृश पाऊस झाला. यामुळे सर्व भागात पाणीच पाणी झाले. महापूरस्थिती ओढवल्याने शेतजमिनीत पाणी आले. परिणामी शेतात पाणी साचून राहिल्याने पेरणी केलेल्या पिकांना याचा फटका बसला. यामुळे पेरण्या वाय गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.

Advertisement

दुबार पेरणीचे संकट

शेतजमिनीतील पाणी ओसरू लागल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची कामे हाती घेतली. मात्र जुलै महिन्यात पुन्हा पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा महापुराचे संकट ओढवले. यामुळे पुन्हा शेतात पावसाच्या पाण्यासह महापुराचे पाणी शिरले.

दुहेरी आर्थिक संकट

शेतकऱ्यांना दुबार पेरणीही वाया झाल्याचा धोका सतावत होता. मात्र विविध जलाशयांमधून पाणी सोडण्यात आल्याने शेतातील पाणी ओसरू लागले. पण वारंवार शेतात पाणी येत राहिल्याने काही भागात पावसाचा फटका दुबार पेरणीला बसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पिके वाया तर काही भागात पिके कोमजल्याचे चित्र होते. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

खात्याकडून सर्व्हे

सततच्या पावसामुळे पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदील झाले होते. यामुळे लवकरात लवकर पीक नुकसान सर्व्हे करण्याची मागणी करण्यात येत होती. कृषी खात्याने शेतजमिनीतील पाणी ओसरल्यानंतर सर्व्हेचे काम हाती घेतले. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पीकहानी सर्व्हे करून शेतकऱ्यांकडूनही माहिती संग्रहित करण्यात आली. नुकतेच पीक नुकसान सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून कृषी 57 हजार 831.22 तर 18 हजार हेक्टर बागायत पिकांची हानी झाली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण  75 हजार 831.22 हेक्टरमधील विविध पिकांची हानी झाली आहे. याचा सर्व तपशील जिल्हा प्रशासनामार्फत सरकार दरबारी पाठविला आहे.

अहवाल सरकार दरबारी

राज्य सरकारकडून राज्यभरात झालेल्या पीक नुकसानीची माहिती मागवून घेतली आहे. यानंतर पीक नुकसान सर्व्हेची तपासणी करून एनडीआरएफ व एसडीआरएफ निकषाद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. अद्याप नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली नसली तरी पीकहानीची सर्व माहिती पडताळून भरपाई जाहीर करण्यात येणार आहे. मात्र सरकारने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

युरिया टंचाईचा फटका 

राज्यात युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना केलेल्या पिकांना ज्यावेळी युरियाची गरज होती. तेव्हा राज्यात युरियाचा प्रचंड तुटवडा भासला. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. पाण्यामुळे फटका बसलेल्या पिकांना युरियाची सर्वाधिक गरज होती. मात्र युरियाचा मुबलक साठा नसल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळाला नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article