सुरूचीला सुवर्ण तर इशाला रौप्य
वृत्तसंस्था, म्युनिच (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाज सुरूची इंदरसिंग आणि इशा सिंग यांनी महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजी प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले.
या स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस भारताला खूपच यशस्वी ठरला. सुरूची आणि इशा सिंग यांच्या कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेच्या पदक तक्त्यात आघाडीचे स्थान पटकाविले. गेल्या वर्षी सुरूची इंदर सिंगने यास्पर्धेत याच क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. तिने पुन्हा या वर्षी हे सुवर्णपदक स्वत:कडे राखताना 242.1 गुणांची नोंद केली. सुरूची इंदिरसिंगची ज्येष्ठ सहकारी इशा सिंगने याक्रडा प्रकारात 241.2 गुणांसह रौप्य पदक मिळविले. याक्रीडा प्रकारात कोरियाच्या चु गेयुनने कांस्यपदक घेतले.
आता या स्पर्धेत आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळविले आहे. आता या स्पर्धेत पुरूषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याला पात्र फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर अंतिम फेरीत त्याला अपात्र ठरविण्यात आले. पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या रुद्रांश पाटीलची कामगिरी तसेच अनिश, उदयवीर सिद्धू, सुरज शर्मा यांची कामगिरी निराशाजनक झाली. या क्रीडा प्रकारात भारतीय पुरूष नेमबाजांना पदकांपासून वंचित व्हावे ला