ईशान्य राज्यातील सशस्त्र गट UNLF चे आत्मसमर्पण; केंद्राबरोबर शांतता करार
ईशान्येकडील राज्यातील सर्वात जूना सशस्त्र गट मानला जाणारा युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) या इंफाळ खोऱ्यातील बंडखोर गटाने आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केली. केंद्र सरकार बरोबर केलेल्या शांतता करारानंतर UNLF च्या सदस्यांनी आपापली हत्यारांचा त्याग करून समर्पण केले.
या संबंधीची माहीती देताना केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर (X) सोशल मीडीया अकाउंटवर काही फोटो आणि समर्पणाचे व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर लिहीताना ते म्हणाले, “ हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड ईशान्येत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांनी आज नवी दिल्लीत UNLF ने शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. UNLF, मणिपूरचा सर्वात जुना खोऱ्यातील सशस्त्र गट, हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमत आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
केंद्रिय गृह मंत्रालयाने (MHA) UNLF याच्यासह अनेक अतिरेकी संघटनांवर बंदी घातली आहे. ल्यानंतर काही दिवसातच हा शांतता करार झाला. या संघटना मणिपूरमधील सुरक्षा दल, पोलीस आणि नागरिक यांच्यावरील हल्ले आणि हत्या तसेच भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवाया करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्यासंबंधातील निर्णय घेतला.