महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुख्तार अन्सारींचा पुत्र उमरचे आत्मसमर्पण

06:27 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मऊ

Advertisement

माफिया मुख्तार अन्सारीचा धाकटा मुलगा उमर अन्सारी याने मऊच्या खासदार/आमदार न्यायालयात आत्मसमर्पण केले. मार्च 2022 पासून म्हणजे 19 महिन्यांपासून तो फरार झाला होता. बुधवारी दुपारी तो शांतपणे आपल्या 2-3 वकिलांसह न्यायालयात हजर झाला. सुनावणीनंतर न्यायालयाने प्रत्येकी 20,000 आणि 50,000 ऊपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर त्याला जामीन मंजूर केला. त्याच्याविरोधातील ही प्रकरणे आचारसंहिता उल्लंघन आणि द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित आहेत. एकंदर तीन प्रकरणांमध्ये उमर अन्सारीविऊद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, उमर अन्सारीला उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता.

Advertisement

उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट आणि 82 प्रकरणी दिलासा देण्यासाठी कनिष्ट न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर उमर अन्सारी न्यायालयात हजर झाला. न्यायमूर्ती श्वेता चौधरी यांच्या न्यायालयाने त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. फिर्यादीनुसार, एसआय गंगाराम बिंद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे आमदार अब्बास अन्सारी आणि इतरांचीही नावे एफआयआरमध्ये जोडण्यात आली आहेत.

धमकी दिल्याचा आरोप

3 मार्च 2022 रोजी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पहारपूर मैदानावर जाहीर सभेला संबोधित करताना अब्बास अन्सारी यांनी मऊ प्रशासनाला धमकी दिल्याचा आरोप आहे. अब्बास अन्सारी हे सदर विधानसभा मतदारसंघातून सुभासपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तपासानंतर पोलिसांनी सदरचे आमदार अब्बास अन्सारी, भाऊ उमर अन्सारी आणि इतरांविऊद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article