सूरमा हॉकी क्लबचा विजय
वृत्तसंस्था / राऊरकेला
2025 च्या पुरुषांच्या हॉकी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सूरमा हॉकी क्लबने दिल्ली पायपर्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात सूरमा हॉकी क्लब संघातील हर्मनप्रित सिंगने दोन गोल नोंदविले.
उभय संघातील सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून गोल करण्याच्या संधी वाया गेल्या. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दिल्ली पायपर्सतर्फे टॉमस डोमेनीने 43 व्या मिनिटाला तर मनजित सिंगने 45 व्या मिनिटाला असे दोन गोल केल्याने दिल्ली पायपर्सने सुर्मा हॉकी क्लबवर सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत 2-0 अशी आघाडी मिळविली होती. दरम्यान सूरमा हॉकी क्लबच्या हरमनप्रित सिंगने 48 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल केल्याने ही लढत पुन्हा बरोबरीत राहिली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी साधल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये विवेक सागर प्रसाद, निकोलास किनेन, बोरीस बुर्केट यांनी दिल्लीचे गोल केले तर सूरमा हॉकी क्लबचा गोलरक्षक विनसेंटने दिल्ली पायपर्सच्या खेळाडूंचे पेनल्टी शूटआऊटमध्ये 3 फटके अडविले.