सूर्याचा ‘सीन’मध्ये पोलिसी थाट
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सूर्या याच्या आगामी ‘सीन’ या चित्रपटाचा हिंदी टेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक जीतू माधवन यांच्या या चित्रपटात सूर्या एका हटके पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अभिनेता नसलेन एका निर्दयी गुन्हेगाराची भूमिका साकारत असून, त्याचा आणि सूर्याच्या पात्राचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी आणि रहस्याचा मिलाफ असल्याचे टेलरवरून दिसून येते. दिवाळीच्या मुहूर्तावर 6 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. नोकरी सोडून राजकारणात जाण्याची इच्छा
टेलरची सुऊवात इनबराज (सूर्या) या पोलीस अधिकाऱ्याच्या नोकरीचा राजीनामा देण्यापासून होते. कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना त्याने अचानक नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि कनिष्ठ कर्मचारी आश्चर्यचकित होतात. नोकरी सोडल्यानंतर घरी निवांत वेळ घालवण्याची इनबराजची इच्छा असते. मात्र, त्याचे वरिष्ठ अधिकारी स्टीफन त्याला वारंवार कार्यालयात बोलावतात. इनबराज त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर स्टीफन त्याला आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना घरी पाठवतात. इनबराजने कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतला आणि त्याच्या पुढील योजना काय आहेत, असा प्रŽ स्टीफन त्याला विचारतात. त्यावर इनबराज राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याच्या या निर्णयामुळे कथानकाला वेगळे वळण मिळते.
नसलेनच्या क्रूर भूमिकेचे आव्हान
टेलरमध्ये ईश्वरन (नसलेन) या पात्राचीही झलक दाखवण्यात आली आहे. तो एक निर्दयी गुन्हेगार असून, इनबराजला आपला प्रतिस्पर्धी मानतो. त्यामुळे दोघांमधील संघर्ष चित्रपटातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. नसलेनच्या या भूमिकेमुळे चित्रपटात अॅक्शन आणि थराराची रंगत वाढणार असल्याचे दिसते. याशिवाय, अभिनेत्री नजरिया नझीम हिच्या माया या पात्राचीही टेलरमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळते.
6 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत
सूर्याच्या कारकिर्दीतील हा 47वा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांनी शनिवारी चित्रपटाचा हिंदी टेलर प्रदर्शित केला. टेलर सोशल मीडियावर शेअर करताना सूर्याने प्रेक्षकांना कुटुंबीय आणि मित्रांसोबत चित्रपटगृहांत येऊन चित्रपटाचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
