महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुषार देशपांडेवर शस्त्रक्रिया

06:36 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

मुंबई रणजी संघाचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याला काही दिवसांपूर्वी घोटा दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील  दुसऱ्या फेरीत खेळता आले नाही. लंडनमध्ये तज्ञ डॉक्टरांनी तुषार देशपांडेच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आहे.

Advertisement

तुषार देशपांडेने मंगळवारी या शस्त्रक्रियेची माहिती सोशल मीडीयाला दिली. 2025 च्या रणजी क्रिकेट हंगामासाठी घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 खेळाडूंच्या मुंबई संघामध्ये तुषार देशपांडेला वगळण्यात आले आहे. 2023-24 च्या रणजी हंगामात मुंबईने अजिंक्यपद पटकाविले. मुंबई संघाने आतापर्यंत विक्रमी 43 वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या जुलैमध्ये झिंबाब्वेच्या दौऱ्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.11 ऑक्टोबरपासून रणजी क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार असून मुंबईचा पहिला सामना बडोदा संघाबरोबर होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article