तुषार देशपांडेवर शस्त्रक्रिया
वृत्तसंस्था / मुंबई
मुंबई रणजी संघाचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याला काही दिवसांपूर्वी घोटा दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत खेळता आले नाही. लंडनमध्ये तज्ञ डॉक्टरांनी तुषार देशपांडेच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आहे.
तुषार देशपांडेने मंगळवारी या शस्त्रक्रियेची माहिती सोशल मीडीयाला दिली. 2025 च्या रणजी क्रिकेट हंगामासाठी घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 खेळाडूंच्या मुंबई संघामध्ये तुषार देशपांडेला वगळण्यात आले आहे. 2023-24 च्या रणजी हंगामात मुंबईने अजिंक्यपद पटकाविले. मुंबई संघाने आतापर्यंत विक्रमी 43 वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या जुलैमध्ये झिंबाब्वेच्या दौऱ्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.11 ऑक्टोबरपासून रणजी क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार असून मुंबईचा पहिला सामना बडोदा संघाबरोबर होणार आहे.