कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'शब्दांच्या पलीकडले' पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार : रामचंद्र आंगणे

11:37 AM Sep 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सुरेश ठाकूर यांच्या'शब्दांच्या पलीकडले' पुस्तकाचे आचरा येथे प्रकाशन.

Advertisement

आचरा । प्रतिनिधी
'शब्दांच्या पलीकडले' हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११ शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकात चितारलेल्या आहेत. प्रत्येक विद्यामंदिरातील संदर्भ पुस्तकांच्या कपाटात 'शब्दांच्या पलीकडले' हे संदर्भ पुस्तक प्रमुख स्थान पटकावणार हे निश्चित!" असे गौरवोद्गार रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सिंधुदुर्ग तथा माजी स्वीय सहाय्यक शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादिवशी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना काढले‌. आपल्या भाषणात त्यांनी पुस्तकातील विविध उदाहरणे देऊन हे संदर्भ पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, लेखक, पत्रकार भाषा अभ्यासक अशा सर्वांना उपयुक्त कसे ठरेल हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांच्या 'शब्दांच्या पलीकडले' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच बा. ना. बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं. १ येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी रामेश्वर वाचनालायचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो, जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे अध्यक्ष अशोक कांबळी, आचरे ग्रामपंचायत सरपंच जोरोन फर्नांडिस, डॉ. विनायक करंदीकर, द. शि. हिर्लेकर गुरुजी, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि कवी विठ्ठल कदम, म. ल. देसाई, सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल, पांडुरंग कोचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शब्दांच्या पलीकडले' या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन आचरे सरपंच जोरोन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

मधु मंगेश कर्णिक यांनी दिल्या शुभेच्छा

कोमसापचे संस्थापक आणि ज्येष्ठ लेखक आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी खास पत्ररुपी संदेश लिहून आपल्या मौलिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "सुरेश ठाकूर यांनी गेली अनेक वर्षे कोमसापच्या माध्यमातून कोकणातील उमलत्या आणि उमललेल्या लेखकांना हक्काची प्रकाश खिडकी उपलब्ध करून दिली आहे. आज त्यांचे हे पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. मराठी शब्दांचे कूळ आणि मूळ धुंडाळण्याचा या पुस्तकात त्यांनी जो व्यासंगी प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक करावे असे वाटते. त्यांच्या उपक्रमाला माझे वडीलधारीपणाचे आशीर्वाद असल्याचे म्हणाले.पुस्तकं प्रकाशन सोहळा प्रसंगी बोलताना सुरेश ठाकूर यांनी 'शब्दांच्या पलीकडले' हे पुस्तक समारंभपूर्वक रामेश्वर वाचन मंदिराला अर्पण केले. अर्पण सोहळ्याच्या वेळी सुरेश ठाकूर म्हणाले, "रामेश्वर वाचन मंदिर या वाचनालयाने मला बालपणापासूनच सकस आणि चोखंदळ वाचनाचे वेड लावले. आजचे संदर्भ पुस्तक हे त्याचाच एक परिपाक आहे. त्याच माझ्या या शब्दतीर्थाला हे माझे पुस्तक अर्पण करीत असल्याचे म्हणाले. या सोहळ्याला नितीन वाळके, चारुशीला देऊलकर, प्रकाश पेडणेकर, लक्ष्मणराव आचरेकर, स्मिता बर्डे, प्रमोद कोयंडे, रामचंद्र वालावलकर, सुरेश गावकर, कल्पना मलये, विजय चौकेकर आदी मान्यवरांसहित कोमसाप शाखा मालवण, साने गुरुजी कथामाला मालवण, रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरे नं. १ आदी संस्थांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल, प्रास्ताविक गुरुनाथ ताम्हणकर आणि आभार सुगंधा गुरव यांनी मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article