सुरभि तिवारीला मिळाली मोठी संधी
सूरज बडजात्यांच्या चित्रपटात मिळाले काम
टीव्ही मालिका ‘शरगुन’द्वारे घरोघरी ओळख मिळविणारी अभिनेत्री सुरभि तिवारी दीर्घकाळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तिला मागीलवर्षी ‘छोटा भीम अँड दकर्स ऑफ दमयान’मध्ये पाहिले गेले होते. सुरभिला आता एका मोठ्या बॅनरचा चित्रपट मिळाला आहे. टीव्ही शोमध्ये काम केल्यावर सुरभि तिवारी आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे.
सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात ती कमा करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘ये प्रेम मोल लिया’ असणार आहे. चित्रपटात सुरभिसोबत आयुष्मान खुराना, शर्वरी वाघ, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक, आलोक नाथ, अनुपम खेर, मोहनीश बहल आणि शाद रंधावा हे कलाकार दिसून येणार आहेत. बडजात्या यांचा हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कौटुंबिक कहाणीवर आधारित असणार आहे. सुरभिने आतापर्यंत घर जमाई, कहानी घर-घर की, शगुन, कुमकुम एक प्यारा सा बंधन यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 2022 साली स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातील समस्या जगासमोर मांडल्यावर सुरभि चर्चेत आली होती. तिने स्वत:च्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदविली होती.