For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur success story | संसाराचा गाडा ओढत बेनिक्रेची सुरैया देसाई राज्यात पहिली; 'MPSC' परीक्षेत कोल्हापूरचा डंका!

04:32 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur success story   संसाराचा गाडा ओढत बेनिक्रेची सुरैया देसाई राज्यात पहिली   mpsc  परीक्षेत कोल्हापूरचा डंका
Advertisement

                                   संसार सांभाळत सुरैया देसाई राज्यात प्रथम

Advertisement

बेनिक्रे (ता. कागल) - येथील सुरेया साहेबलाल देसाई यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अजय तोडकरविश्वजीत लाटकर त्यांची विक्रीकर सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे. सुरैया देसाई यांनी दुहेरी जबाबदारीसह सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर गतवर्षी झालेल्या परीक्षेत त्यांनी विक्रीकर सहाय्यक पद मिळवले आणि आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत यशाला गवसणी घातली.

त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील विश्वजीत विनायक लाटकर यांनीही परिथितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांची टॅक्स असिस्टंट व महसूल सहायक या दोन्ही पदावर निवड झाली आहे. त्यांचे वडिल इचलकरंजी डेपोमध्ये कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. तर आई घरकाम करते. १ ते दिड वर्षे अभ्यासाची तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्यांनी बीएससीची पदवी दत्ताजीराव कॉलेजमधून मिळवली आहे. यानंतर त्यांनी पुण्याला अभ्यासाची प्रॅक्टीस केली आहे.

Advertisement

विद्याप्रबोधिनीच्या चौघांची निवड
त्याचबरोबर विद्याप्रबोधिनीच्या चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०२४ परीक्षेच्या अंतिम गुणवत्तेत यश संपादन केले आहे. त्यांना विविध पदावर पोस्टिंग मिळाले आहे. यामध्ये सायली भोसले यांची पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ पदी निवड झाली आहे. तर अजय तोडकर यांची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली आहे. प्रणाली कुलकर्णी यांची निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब पदी निवड झाली आहे. तर गीतांजली साठे यांची उद्योग उपसंचालक तांत्रिक, गट-अ पदी निवड झाली आहे.

सुरैयाची प्रेरणादायी कामगिरी
सुरैया देसाई यांनी संसार सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यशाने कोल्हापुरची मान उंचावली आहे. त्यांनी उच्च शिक्षणासाठी बी.टेक. पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. पती खाजगी नोकरी करत असताना संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. घर, संसार आणि अभ्यास यांचा समतोल साधणे आव्हान होते, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. संसायाच्या जबाबदारीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत थोडक्यात संधी गेली. अशा वेळी त्यांच्या आईने त्यांना मोलाची साथ दिली. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर गतवर्षी झालेल्या परीक्षेत त्यांनी विक्रीकर सहाय्यक पद मिळवले आणि आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. त्यांना कुटूंबियातील सदस्यांची साथ मिळाली.

Advertisement
Tags :

.