महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुरभि चंदना थाटणार संसार

06:02 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या विवाहाच्या योजनेनंतर आता टीव्ही अभिनेत्री सुरभि चंदना देखील विवाहाची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरभि चंदना ही प्रियकर करण शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दोघेही सप्तपदी चालणार आहेत.

Advertisement

अभिनेत्री सुरभि ही प्रियकर अन् उद्योजक करण शर्मासोबत 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्sय आहे. सुरभि आणि करणची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. अनेक वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर सुरभिने 9 सप्टेंबर 2022 रोजी  करणच्या जन्मदिनी सोशल मीडियावर एक पोसट करत स्वत:च्या प्रेमसंबंधांची वाच्यता केली होती.

Advertisement

मार्चच्या अखेरीस सुरभि प्रियकर करणसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. स्वत:च्या कुटुंबीयांशी बोलून दोघेही विवाहाची तारीख जाहीर करणार आहेत. सुरभिने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेद्वारे 2009 मध्ये केली होती. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसून आली होती. स्टार प्लसवरील ‘इश्कबाज’मध्ये तिला मोठी संधी मिळाली होती. यानंतर ‘संजीवनी’, ‘नागिन 5’, ‘शेरदिल शेरगिल’ यासारख्या कार्यक्रमांमध्ये तिने काम केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article