सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे आणि शशी थरूर यांचे निलंबन! लोकशाहीसाठी काळा दिवस- सुप्रिया सुळे
संसदेच्या हिवाळी अदिवेशनादरम्यान झालेल्या घुसखोरीवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असा प्रकारचा आग्रह धरल्याने संसदेमध्ये निलंबंन आजही सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत 141 खासदारांना निलंबित करण्यात आले असून या प्रमुख खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्य़ा खासदार सुप्रिया पवार, अमोल कोल्हे, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, मनिष तिवारी या खासदारांचा समावेश आहे. निलंबनानंतर सरकारला चर्चा करायला नको आहे. आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असून, लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज दिल्लीमध्ये होत आहे. देशात दडपशाही सुरु असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
हिवाळी अधिवेशनामध्ये काल झालेल्या खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. आजच्या दिवशीही 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. संसदेचे कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी करून घोषणाबाजी केली. त्यावरूनलोकसभा अध्यक्षांचा अपमानाचा ठपक ठेऊन अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं.
यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली यांचा समावेश आहे.
निलंबनानंतर एका खाजगी न्युज वाहीनीसाठी मुलाखतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्ही लोकशाहीच्या मार्गानं निवडून आलो आहोत. पण देशात दडपशाही सुरु झाली आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त खासदार निलंबित करण्यात आली असून संसदेमध्ये हल्ला झाला, त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन हल्ल्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे. या हल्ल्यावर चर्चा व्हायलाच हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही. कारण देशात दडपशाही सुरू आहे. लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा, लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज दिल्लीमध्ये होतंय " असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.