For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुप्रिया श्रीनेत यांना उमेदवारी नाकारली

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुप्रिया श्रीनेत यांना उमेदवारी नाकारली
Advertisement

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिकांना हटविण्याचा मुद्दा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळविलेल्या अभिनेत्री कंगना राणौत यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीनेत यांना उत्तर प्रदेशातील महाराजगंज मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. तथापि, यंदा या वादामुळे त्यांचे नाव उमेदवारांच्या सूचीतून वगळण्यात आले आहे. श्रीनेत यांचा त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकज चौधरी यांच्याकडून मोठा पराभव झाला होता. यंदा त्यांना उमेदवारी न देण्याचे हे ही एक कारण आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. यंदा महाराजगंज मतदारसंघातून काँग्रेसने वीरेंद्र चौधरी यांना संधी दिली आहे. कंगना राणौत यांनी गतकाळात काही चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांच्या संदर्भात श्रीनेत यांनी पातळी सोडून टिप्पणी केली होती. ‘क्या भाव चल रहा है मंडीमे, कोई बतायेगा’ अशी अवमानजनक पोस्ट त्यांनी काही दिवसांपूर्वी राणौत यांच्या संदर्भात इंटरनेटवर टाकली होती. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडियामधून टीकेचा भडीमार झाला होता. त्याची झळ काँग्रेस पक्षालाही लागली होती. त्यामुळे त्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.