कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिस इंडिया फॅब्युलस २०२५ ची विजेती ठरली सुप्रिया देसाई

11:26 AM Jul 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

Advertisement

मिस्टर, मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीनच्या सीझन ५ मध्ये विशेष क्वीन्स श्रेणीतील 'मिस इंडिया फॅब्युलस २०२५'ची विजेती ठरली होंडा- सत्तरी गोवा येथील सुप्रिया सूर्याजी देसाई. ती मूळ पाल (कुडासे खुर्द पुनवर्सन) या तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावची. पण,वडील नोकरीनिमित्त गोव्यात आली आणि ती गोवेकर झाली असली तरीही ती दोडामार्ग तालुक्यातील पाल पुनर्वसन गावची सुकन्या आहे तीच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. नीलम पराडिया यांनी द टोपाझ इव्हेंट्सच्या सहकार्याने पती कल्पेश पराडिया यांच्या पाठिंब्याने, मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन २०२५ चे रॉयल ग्लोबल अचीव्हर अवॉर्ड्स सीझन ५ चे आयोजन केले होते.यावर्षी ' रॉयल ग्लोबल कपल' चा शुभारंभ देखील झाला. सोहळा २१ व २२ जून रोजी मुंबई येथील क्लब एमराल्ड येथे आयोजित करण्यात आला होता.यात भारतासह, यूके, सिंगापूर, यूएई, श्रीलंका आणि नेपाळमधील स्पर्धक सहभागी झाले होते.पहिल्या दिवशी स्वागत समारंभानंतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली सघन प्रशिक्षण सत्रे झाली, यात मौल्यवान कौशल्ये आणि अंतर्दृष्टी दिली. निवडीसाठी बहुप्रतिक्षित परिचय फेरी, प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता. बॉलिवूड अभिनेत्री एलेना तुतेजा, सुपरमॉडेल क्रमिक यादव,बॉलीवूड अभिनेता अली खान, ताहीर कमाल खान,कबीर सिंग राजपूत,डॉ.अर्चना चौधरी,श्याजमी हुसेन (सिंगापूर),अर्पिता मिश्रा आणि प्रियंका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.कुमारी सुप्रिया देसाई ही पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे.डान्सिंग, ट्रॅव्हलिंग, मॉडेलिंग हे तिचे छंद आहेत. लहानपणापासूनच रॅम्प वॉक आणि फोटोशूट करणे हे तिचे स्वप्न आहे. दिल्ली येथे २०२२ मध्ये ती मॉडेलिंगमध्ये प्रथम उपविजेता म्हणून, २०२२ मध्ये नवी मुंबई येथे भारत शक्तीमान पुरस्कार तिने पटकावला होता. देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झालीआहे. तिला मॉडेलिंग क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव असून या क्षेत्रातच तिला करिअर घडवायचे आहे.तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या पालकांना देते.माझे पालक माझ्या ताकदीचे आधारस्तंभ आहेत आणि या कामगिरीसाठी ते मला सर्वात मोठा आधार आहेत असे ती अभिमानाने सांगते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # dodamarg # Miss India Fabulous 2025#
Next Article