For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिल्किस बानो प्रकरणात आज ‘सर्वोच्च’चा निर्णय

06:10 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिल्किस बानो प्रकरणात आज ‘सर्वोच्च’चा निर्णय
Advertisement

11 दोषींच्या सुटकेला दिले होते आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच सोमवारी निकाल देणार आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने 11 दिवसांच्या सुनावणीनंतर गेल्यावषी 12 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. गुजरात सरकारने सर्व दोषींची तुऊंगातून सुटका केल्यानंतर बिल्किस बानो यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत याविरोधात याचिका दाखल केली होती. बिल्किसने आपल्या याचिकेत गुजरात सरकारवर आपल्या खटल्यातील दोषींना मुदतीपूर्वी सोडल्याचा आरोप केला आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली आणि टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी या प्रकरणातील 11 दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

Advertisement

2002 मध्ये गोध्रा घटनेत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. तसेच तिच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी 11 जणांना दोषी ठरवण्यात आले. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला या प्रकरणात निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर गुजरात सरकारने एक समिती तयार केली. या समितीच्या शिफारसीनंतर गुजरात सरकारने 11 दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता

Advertisement
Tags :

.