आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा मिळालेला नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, या आठवड्यात याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध होण्याची शक्मयता आहे. आझम खान यांना 29 ऑक्टोबर रोजी दुहेरी पॅनकार्ड प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तुऊंगातून सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ईडीने त्यांना मनी लॉन्डरिंगच्या दुसऱ्या प्रकरणात अटक केली. या अटकेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा उल्लेख करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला, परंतु याचिका याच आठवड्यात सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे संकेत दिले. ईडीने केलेल्या अटकेनंतर गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने 1 नोव्हेंबर रोजी आझम खान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या ते गाझियाबादच्या डासना कारागृहात आहेत. या प्रकरणाचा संबंध रामपूर येथील मोहम्मद अली जौहर विद्यापीठाशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततांशी आहे
