मविआच्या १२ आमदारांबाबत याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलीः सुनील मोदी
कोल्हापूर
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या नियुक्तीची याचिका हायकोर्टाने फेटाळली असल्याची माहिती शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सुनील मोदी यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, आत्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या चिफ जस्टीस आणि बोरकर या बेंचने आमची याचिका फेटाळली आहे. आमची मूळची मागणी अशी होती की, ज्या १२ आमदारांची नावे पाठविली आहेत. त्या १२ आमदारांच्या नावांचा निर्णय झाल्याशिवाय नविन नावे घेता येणार नाहीत, अशी मूळ याचिक होती. ही याचिका एका वाक्यामध्ये फेटाळल्याचा निर्णय दिला आहे. प्राथमिकपणे या निर्णयावर सुप्रिम कोर्टात जाण्याचा विचार करणार आहे. याचिका फेटाण्यामागची नेमकी कारणे कळाल्यावर निर्णय घेतला जाईल. हा कायदेशीर मुद्दा आहे, घटनात्मक मुद्दा आहे. जर याच्यावर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रिम कोर्टात जावे लागेल. मी माझ्या विधिज्ञांशी बोलून यावर निर्णय घेईन.
माझी अपेक्षा अशी होती की घटनात्मक कलम आहे यानुसार पाठविण्यात आलेली यादी आहे या यादीवर राज्यपालांनी निर्णय घ्यावा लागतो. ती यादी परत पाठवता येत नाही. तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश येथे असे निर्णय झालेले आहेत. त्याआधारे न्यायालयाने निर्णय देणे अपेक्षित होते. संविधानात्मक लढाईमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार त्या ठिकाणी संविधानाचे कायदे तुडवून आपलं राजकिय भविताव्य सुरक्षित करताना दिसत आहे. तरी न्यायालयाने बळी पडू नये अशी आमची अपेक्षा आहे. पुढची कायदेशीर लढाई आम्ही सुरू ठेवणार आहोत, असेही सुनील मोदी म्हणाले.