For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परमपुरुष

06:33 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
परमपुरुष
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी । पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ।। 8 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. माउली म्हणतात, जो मन आणि बुद्धि ईश्वराला अर्पण करतो तो त्याच्याशी एकरूप होतो असे भगवंतांनी सांगितले आहे पण त्यासाठी प्रयत्नपूर्वक नामस्मरण करायला हवे पण विषयातील मन काढून घेऊन त्याला ईश्वरस्मरण करायला लावणे सहजी शक्य होत नाही. त्यासाठी निश्चयाने सुरवात करावी. सुरवातीला ते नामस्मरणात स्थिर न झाल्याने इकडेतिकडे भटकू लागेल. त्यावेळी त्याला हटकून तेथून हुसकून लावून पुन्हा नामस्मरणाला लावायला हवे. हे सगळे अभ्यास ह्या सदरात येते.

माउली पुढे म्हणतात, अभ्यासामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परम पुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. ह्यासाठी अभ्यासाची मनाशी सांगड चांगल्याप्रकारे घालावी. प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने निरंतर परमपुरुषाचे ध्यान लावावे. असे झाल्यावर मनाने एकदा आत्म्यास वरले की, देह आहे किंवा गेला ह्याची आठवणही रहात नाही. ज्याप्रमाणे जोराने वहात जाऊन समुद्राला मिळालेल्या नदीच्या पाण्याला आपण कोणकोणत्या डोंगर कपारीतून, कोणकोणत्या खाचखळग्यातून आलो हे आठवतसुद्धा नाही, त्याप्रमाणे नित्य माझे स्मरण करणाऱ्याचे चित्त माझ्याशी एकरूप झाल्यावर त्यासाठी केलेला जन्ममरणाचा शीण आपोआपच विसरते कारण तो परमपुरुषासारखाच चैतन्यपूर्ण होऊन त्याच्याशी एकरस झाल्याने त्याच्यासारखाच आनंदमय झालेला असतो.

Advertisement

माउली पुढे म्हणतात, अभ्यासामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परम पुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. त्याचे जन्ममृत्यूचे चक्र खंडित झाल्याने त्याला काळाचे भय वाटत नाही. आयुष्य आहे तोपर्यंत तो ते लोककल्याणासाठी खर्च करतो. अशा साधकाच्या मनाची अवस्था प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब ह्यांनी त्यांच्या कवितेतून छान मांडली आहे. ती कविता अशी, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी । जिणे गंगौघाचे पाणी । कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप । जसा निळा निळा धूप । जसा

पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा । धन्य निर्माल्याची कळा ।

गंगेचे किंवा कुठल्याही नदीचे पाणी काठावरचे शेती सुजलाम सुफलाम करत पुढेपुढे जात असते त्याप्रमाणे ईश्वरी चैतन्याशी एकरूप झालेला योगी सर्वांचे भले करत, पुढेपुढे जात असतो. त्याला कोणत्याही नावलौकिकाची अपेक्षा नसते. त्याचा मृत्यू हा सर्वांग सोहळा असतो कारण देहात असताना त्याला लोककल्याण करण्यासाठी स्थलकाळाचे बंधन असते परंतु मृत्यूनंतर विश्वव्यापी होऊन अखिल विश्वाचे तो कल्याण करत असतो. अशा प्रसिद्ध पुरुषांचे भक्त, प्रसंगी देवाला बाजूला सारून, अनन्यभावे त्याची भक्ती करत असतात आणि त्यांना त्याच्या अस्तित्वाची प्रचीतीही येत असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.