कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिन्ही दिग्गज नेत्यांचे समर्थक मैदानात

05:08 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात खंडेला नावाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवार उभे आहेत. 2018 मध्ये देखील याच उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. खास बाब म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे तीन दावेदार अशोक गेहलोत, वसुंधरा राजे, सचिन पायलट यांच्या तिघांचे समर्थक परस्परांना आव्हान देत आहेत.

Advertisement

काँग्रेसने महादेव सिंह खंडेला यांना उमेदवारी दिली आहे. खंडेला हे अशोक गेहलोत यांचे निष्ठावंत मानले जातात. मागील निवाडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. तर 2018 मध्ये काँग्रेसचे उमेदवार राहिलेले सुभाष मील आता भाजपचे उमेदवार आहेत.

Advertisement

सुभाष मील हे सचिन पायलट यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर मागील वेळी भाजप उमेदवार असलेले बन्सीधर बाजिया आता अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. बन्सीधर हे वसुंधरा राजे यांचे समर्थक मानले जातात. खंडेला मतदारसंघात या तिन्ही नेत्यांचे समर्थक परस्परांना आव्हान देत स्वत:च्या विजयाचा दावा करत आहेत.

मागीलवेळी भाजपचे बाजिया पराभूत झाले असले तरीही दीर्घकाळापासून या मतदारसंघावर त्यांच्या परिवाराचा प्रभाव राहिला आहे. जाटबहुल या मतदारसंघात बाजिया किंवा त्याच्या परिवारातील सदस्यच प्रामुख्याने विजयी होत राहिला आहे. बाजिया यांच्यासोबत उर्वरित दोन्ही उमेदवारही जाट समुदायाशी संबंधित आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Political
Next Article